अनुयश आरोग्य प्रतिष्ठानतर्फे ‘मधुसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन
‘मधुमेह आणि जीवनशैली’ याविषयी शनिवारी डॉ. रवींद्र नांदेडकर यांचे मोफत मार्गदर्शन


पुणे:- राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध मधुमेह संशोधक डॉ. रवींद्र नांदेडकर यांनी स्थापन केलेल्या अनुयश आरोग्य प्रतिष्ठानतर्फे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी ‘मधुसंवाद’ या विशेष कार्यक्रमाचे मोफत आयोजन करण्यात येते. या अंतर्गत जागतिक आरोग्य दिनानिमित्त शनिवार दिनांक १३ मे २०२३ रोजी ‘मधुमेह आणि जीवनशैली’ याविषयी डॉ. रवींद्र नांदेडकर मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि एकलव्य बालशिक्षण व आरोग्य न्यासच्या संस्थापक रेणूताई गावस्कर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अनुयश आरोग्य प्रतिष्ठानच्या सचिव रूपाली नांदेडकर आणि विश्वस्त विलास नेवपूरकर यांनी कळविली आहे.
हा कार्यक्रम शनिवार दिनांक १३ मे २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० (पाच) वाजता, दुसरा मजला, पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे होणार असून सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. यावेळी उपस्थित श्रोत्यांना डॉ. रवींद्र नांदेडकर यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळणार असून यावेळी उपस्थित सर्वांची मोफत रक्त शर्करा तपासणी देखील करण्यात येणार आहे. या मोफत कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन अनुयश आरोग्य प्रतिष्ठानच्या सचिव रूपाली नांदेडकर आणि विश्वस्त विलास नेवपूरकर यांनी केले आहे.

See also  काँग्रेस भवन येथे लोकसभा निवडणूक जाहीरनामा बनवण्यासाठी बैठक