बाणेर – पाषाण लिंक रोड येथील मिडोज हॅबीटॅट सोसायटीमध्ये रामलल्ला प्रतिष्ठापना उत्सव साजरा

पाषाण : श्री क्षेत्र अयोध्या नगरीत भव्य राम मंदिरात, प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न होत असतानाच बाणेर – पाषाण लिंक रोड येथील मिडोज हॅबीटॅट सोसायटीमध्ये रामलल्ला प्रतिष्ठापना उत्सव अत्यंत आनंदी उत्साहात आणि भक्तिमय साजरा करण्यात आला.

यामध्ये सोसायटीतील सर्व सभासद आणि रहिवाशांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अयोध्या नगरीतील भव्य राम मंदिर प्रतिकृतीची सुंदर आणि भव्य रांगोळी ह्या निमित्ताने रेखाटण्यात आली होती. सोसायटीतील प्रत्येक घरात दिव्यांद्वारे दिप प्रज्वलन करण्यात आले. सोसायटीचे संपूर्ण आवार राममय झाले होते. सोसायटी परिसरात श्री प्रभू राम प्रतिकृतीचे झेंडे लावण्यात आले होते, रांगोळी, दिवे आणि रामस्तुतीपर गाण्यांनी सोसायटीमध्ये उत्साह, आनंदी आणि भक्तीमय वातावरण निर्मिती झाली होती.

संपूर्ण रहिवाशांनी रामरक्षा पठण, रामस्तुती, कथा, मारुतीस्तोत्र अश्या विविध प्रकारांचे भावपूर्ण, भक्तिमय सादरीकरण केले त्यास सर्वांनी मनापासून दाद देऊन प्रोत्साहित केले.

मिडोज हॅबीटॅट व्यवस्थापकीय समिती तर्फे ह्या सुंदर, नेटके आणि भव्य कार्यक्रमांचेआयोजन करण्यात आले होते. रामनाम जपाची एक माळ सर्वांनी एकत्र भक्तिभावाने म्हटली. प्रभू श्री रामाची आरती आणि प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची जल्लोषात सांगता झाली.

See also  औंध येथील  शिवदत्त मिनी मार्केटचे बेकायदेशीर पुनर्वसन ताबडतोब थांबवण्याची मागणी