बोपोडी : हॅरिस पुल ते खडकी रेल्वे स्टेशन दरम्यान बोपोडी हद्दीतील सुमारे 1 की.मी हद्दीतील रस्ता रुंदीकरण मधील बांधकामावर कारवाई करून काढण्यात आली आली. जुन्या पुणे मुंबई मार्गावरील रस्ता ४२ मीटर रुंदीनुसार होणार आहे. सध्या हा रस्ता काही ठिकाणी पंधरा ते वीस मीटर रुंदीचा होता. यापूर्वीच खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीतील ४२ मी रुंदिनुसार संरक्षण खात्याची 2की.मी लांबितील रस्ता रुंदीकरण जागा ताब्यात आली व प्रत्यक्ष काम पुणे म.न.पा मार्फत सुरू करणेत आले. तसेच रेंज हिल चौक ते CEOP दरम्यानचे सुमारे 2.25 किमी लांबीचे रुंदीकरण यापूर्वीच पूर्ण करणेत आले आहे.
कारवाई मूळे हॅरिस पुल ते सिओईपी पर्यंत संपूर्ण रस्ता 42 मीटर रुंदीकरणानुसार नागरिकांना सुमारे एक वर्षात उपलब्ध होऊ शकेल.
एकूण ६३ मालमत्ता ताब्यात घेतल्या जात आहेत. एकूण क्षेत्रफळ ४९७९ चौ.मी. असून 2018 पासून संपादन प्रलंबित होते. या कारवाईमध्ये सुमारे 50 अधिकारी आणि 75 मजूर, 5 पी.आय. आणि 25 अधिकार्यांसह 450 पोलिस कर्मचारी, एसीपी आरती बनसोडे, उप उपायुक्त यांच्या नेतृत्वाखाली संपादन प्रक्रिया पार पाडण्यात आली. अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे आणि पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त प्रतिभा पाटील, उपायुक्त महेश पाटील, सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे, विशेष भूसंपादन अधिकारी शेंडगे, नगरनियोजनच्या सहायक शीतल भिंगारदिवे, औंध क्षेत्रिय कार्यालयाचे सहायक आयुक्त संदीप खलाटे, कार्यकारी अभियंता दिनकर गोजारे, उपअभियंता प्रशांत महिंद्रकर, तसेच अतिक्रमण विभागातील अधिकारी या कारवाईत सहभागी झाले होते. ४ प्रकरणांमध्ये महानगरपालिकेच्या विरूध्द जे दावे होते त्या दाव्यांचा निकाल महानगरपालिकेच्या बाजूने लागलेला आहे. लवकरच या ठिकाणी रस्त्याचे काम करण्यात येणार असल्याचे पुणे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले