उन्नत भारत अभियान प्रादेशिक केंद्र, महाराष्ट्र राज्य, डॉ. धनंजयराव गाडगीळ शाश्वत ग्राम विकास केंद्र आणि सहज जलबोध अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने “जल आराखडा निर्माण” प्रकल्पाचे शनिवारी उद्घाटन

पुणे : उन्नत भारत अभियान प्रादेशिक केंद्र, महाराष्ट्र राज्य, डॉ. धनंजयराव गाडगीळ शाश्वत ग्राम विकास केंद्र आणि सहज जलबोध अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने “जल आराखडा निर्माण प्रकल्प 2023-24च्या उद्घाटनाचा कार्यक्रम शनिवार, दि. 09 सप्टेंबर 2023 रोजी न्यू सेमिनार हॉल, नवीन शैक्षणिकइमारत सभागृह, गोखले इन्स्टिट्यूट याठिकाणी संपन्न होत आहे.


“नॉलेज-कॉलेज-व्हिलेज” सहयोगी योजनेअंतर्गत ज्ञानग्राम म्हणजेच शाश्वतग्राम प्रकल्पाचा पहिला व मूलभूत टप्पा “जल आराखडा निर्माण प्रकल्प, यात महाराष्ट्रातील 32 महाविद्यालयांनी दत्तक घेतलेल्या 160 गावांचे जल आराखडे निर्माण करण्याचा संकल्प आहे. या प्रकल्पासाठी संपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन सहज जलबोध अभियान माध्यमातून होणार असून, एकुण 32 सहज जलबोध निसर्गरक्षकांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे असे सहज जलबोध अभियानाचे प्रणेते उपेंद्रदादा धोंडे
यांनी सांगितले आहे.


औपचारिक उद्घाटन, जल आराखडा निर्माण 2023-24 पुस्तिका विमोचन आणि सर्व सहभागी सदस्यांसाठी प्रकल्प परिचय वर्ग असे या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे. या प्रकल्पातून निर्माण
जल आराखडे शासन व स्वयंसेवी संस्थांना उपलब्ध करून देण्यात येतील जेणेकरून महाराष्ट्रातील जलसंधारण कार्यात अचूकता येण्यासाठी मोठी मदत होणार आहे असे मत समन्वयक डॉ. कैलास नरहरी बवले यांनी व्यक्त केले आहे.


धनंजयराव या कार्यक्रमाचे उडघटन गोखले इन्स्टिट्यूट चे कुलगुरू डॉ. अजित रानडे करणार असून महाराष्ट्र विकास केंद्राचे संस्थापक अध्यक्ष श्री. अनिल पाटील, महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा विभागातून निवृत्त महासंचालक, ज्येष्ठ जल अभ्यासक श्री. दि. मा. मोरे, शाश्वत विकास केंद्राचे संचालक डॉ. गुरुदास नुलकर तसेच दतक गावातील युवक आणि मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, निसर्गरक्षक आणि जल अभ्यासकांची उपस्थिती असणार आहे.

See also  पंढरीच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे