मुंबई : आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यात आला. लोकसभेच्या जागा वाढवण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली.
मुंबई येथील राष्ट्रवादी भवन याठिकाणी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीत शरद पवार यांनी पक्षातील प्रमुख नेते, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसह पुर्ण दिवसभरात कोल्हापुर, अहमदनगर, माढा, सातारा, परभणी, बीड उस्मानाबाद, नाशिक आणि दिंडोरी या लोकसभा मतदार संघांचा आढावा घेतला. पक्षबांधणीच्या दृष्टीने पक्षाची ध्येयधोरणे आखण्यासाठी ही बैठक झाली आहे.
कर्नाटक निकालानंतर राज्यात महाविकास आघाडी लोकसभा निवडणुका एकत्रित लढणार असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु जागा वाटप कसे होणार याबाबत अद्याप चर्चा करण्यात आलेली नाही या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने लोकसभेच्या जागा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे सांगितले जात आहे.