बालेवाडीत व्यापारी असोसिएशनच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा

बालेवाडी : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने “बालेवाडी बाणेर व्यापारी असोसिएशन” बालेवाडी यांच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्याना त्यांच्या पदांची शपथ देण्यात आली. सर्व व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व्यापारी एकत्रित येऊन उत्साहात बालेवाडीतील दसरा चौकातून पदयात्रा काढण्यात आली.

यानिमित्ताने व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष अरुणकुमार खंडेलवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला सर्व पदाधिकारी वसंत ताजणे उपाध्यक्ष, सुदर्शन बालवडकर, सचिव, राजेश विधाते, सहसचिव, हरिराम चौधरी, कोषाध्यक्ष सुरेशकुमार चौधरी, किशन देवासी, सोहन चौधरी, सुखाराम चौधरी, मोहनलाल चौधरी, जोगाराम गुजर, निर्मल चौधरी, सुधीर बालवडकर उपस्थित होते.


पदयात्रेची सुरुवात दसरा चौकातून करत बालेवाडी हायस्ट्रीट, गणराज चौक, बालेवाडी फाटा, लक्ष्मी माता मंदिर व बालेवाडी गावातून पुन्हा दसरा चौकात आली, त्यामधील सर्व नागरिक, व्यापारी वर्ग, महिला व मुलांचा मोठा सहभाग असल्याने अतिशय आनंदमय वातावरणात एकतेचा संदेश देत उत्साहात पार पडली.

See also  सहकार महर्षी डॉ. दिलीप मुरकुटे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेविका 'श्री भैरवनाथ पुरस्कार' वितरण व दहावी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न..