राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वर्धापन दिनाची केडगाव अहमदनगर येथील सभा रद्द

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचा कार्यक्रम, दि. ९ जून २०२३ रोजी, केडगाव, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र, वेधशाळेच्या माहितीनुसार पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. या बिपरजॉय चक्रीवादळामुळे वेधशाळेने राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सामान्य नागरिक व प्रशासनाची गैरसोय होऊ नये म्हणून तसेच वेधशाळेच्या सतर्कतेच्या इशाऱ्याचे पालन करून आपण वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम पुढे ढकलत आहोत. कार्यक्रमाचा नवीन दिवस, वेळ व स्थळ लवकरच जाहीर केले जाईल, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. अजितदादा पवार यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.

See also  काँग्रेस भवन येथे लोकसभा निवडणूक जाहीरनामा बनवण्यासाठी बैठक