मांजरी हडपसर येथे दिव्यांगाना पूर्ण पोषाख वाटप

हडपसर : आईसाहेब प्रतिष्ठान मांजरी बु ., डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुजन विकास संस्था यांच्या वतीने,शिव- भिम फेस्टीवल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमुख मान्यवरांच्या हस्ते २० दिव्यांग पुरुष व महिलांना, पूर्ण पोषाख व साडी देऊन सन्मानित केले .

यावेळी संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण  भोसले, कार्याध्यक्ष बाळासाहेब भोसले,दत्तात्रय जयसिंग ननावरे, सुरेश अण्णा घुले, रोहीदास शेट उंदरे, यशवंत नडगम, संघमित्रा गायकवाड, संगिता घुले, बापुसाहेब घुले,मिनाज मेमण ,जितीन कांबळे,बालाजी अंकुश राव,नितीन जाधव, जीवन गाडे, आदी उपस्थित होते.

उपक्रमाचे हे सलग दुसरे वर्षे आहे. मदत देऊन सामाजिक बांधिलकी म्हणून दिव्यांगाना मदत करण्यात आली.

See also  औंध मध्ये गुन्हेगारी शून्यावर आणून नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणार - पोलीस आयुक्त अमितेश कुमार