नांदेड जिल्ह्यातील बोंडर गावातील भीमसैनिक अक्षय भालेराव हत्याकांडाच्या विरोधात औंध डी पी रोड मध्ये रिपब्लिकन पक्षाची निदर्शने आंदोलन

औंध : औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ नांदेड जिल्ह्यातील बोंडर गावातील भीमसैनिक शहीद अक्षय भालेराव हत्याकांडाच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने आंदोलन करीत अक्षय भालेराव च्या जातीयवादी मारेकऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनामध्ये मागण्यांचे निवेदन चतु:शृंगी पोलीस स्टेशन औंध पोलीस चौकीचे पीएसआय बाबासाहेब झरेकर यांना निवेदन देण्यात आले.या आंदोलनाचे संयोजन रमेश ठोसर (नेते रिपाई पुणे शहर) यांनी केले होते.या आंदोलनात मोहनराव मस्के (बहुजन भिमसेना नेते) मा.संजय कांबळे (रिपाई पुणे शहर नेते), आनंद घेडे (रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सचिव म राज्य),जीवन घोंगडे( रिपब्लिकन स्वाभिमानी पक्ष अध्यक्ष पुणे शहर ), तुकाराम गाडे (सचिव रिपाइंपुणे शहर) , योगेश भोसले(संघर्ष युवा प्रतिष्ठान पदाधिकारी), अमोल शेलार , संदीप ससाणे ,संदीप ठोसर,निलेश ठोसर,किरण मोरे,प्रशांत शिंदे,अमोल धावारे, हिराताई घोडेराव ,छायाताई ठोसर महिला व इ.युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांवर महाराष्ट्राची मोहोरसासवड देशात प्रथम; लोणावळा तिसऱ्या स्थानी