प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने जी-२० बैठकीचे आयोजन यशस्वी करावे-उपायुक्त वर्षा लड्डा-ऊंटवाल

पुणे :- जी-२० प्रतिनिधी बैठकीच्या पूर्वतयारीत सर्व प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम समन्वय राखत आयोजन यशस्वी करावे, असे आवाहन महसूल उपायुक्त वर्षा लड्डा ऊंटवाल यांनी केले.

पुणे येथे १२ ते १४ जून दरम्यान आयोजित ‘डिजिटल इकोनाॅमी वर्किंग ग्रुप’ बैठकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, नगरपालिका प्रशासन सह आयुक्त पूनम मेहता, महसूल उपायुक्त रामचंद्र शिंदे, अपर जिल्हाधिकारी विकास मोरे आदी उपस्थित होते.

बैठकीत जी-२० परिषदेनिमीत्त सुरक्षा व्यवस्था, पाहुण्यांचे स्वागत, सांस्कृतिक कार्यक्रम, डिजिटल संकल्पनेतवर आधारित प्रदर्शन, ऐतिहासिक स्थळांना भेटी आदी विषयांचा आढावा घेण्यात आला जी-२० बैठकीसाठी येणाऱ्या प्रतिनिधींच्या आगमनप्रसंगी विमानतळावर पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीला विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

See also  राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीरनामा समिती वळसे पाटील अध्यक्ष