डॉक्टर दिलीप मुरकुटे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन व आदर्श मातांचा सत्कार

बाणेर : डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या अभिष्टचिंतन सोहळयानिमित्त महाराष्ट्र भुषण समाज प्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन व आदर्श मातांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दि. 12/06/2023 रोजी सायं 6.30 वाजता महाळुंगे सांस्कृतिक हॉल येथे करण्यात आले आहे.

यावेळी आमदार सचिन अहिर, समाजसेविका ममता सिंधुताई सपकाळ, शहर प्रमुख गजानन थरकुडे, पृथ्वीराज सुतार, शंकर मांडेकर, डॉ. दिलीप मुरकुटे, किरण मुरकुटे , गणेश मुरकुटे आदी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमांमध्ये 15हून अधिक आदर्श मातांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.

See also  मनोज मांढरे यांना संत मुक्ताबाई संस्थानचा " भागवत धर्म प्रसारक " पुरस्कार जाहीर