पुणे
: नागरस रोड (भाले चौक) औंध येथे विनापरवाना 114 मीटर रस्ते खोदाई करून विद्युत केबल टाकण्यात आली आहे. हा सर्व प्रकार 7 मे 2023 रोजी घडला आणि या संदर्भातील माहिती पथ विभागाचे वरिष्ठ अभियंता विजय कुलकर्णी यांना व्हाट्सअप द्वारे संबंधित प्रकाराचे फोटो पाठवून तक्रार
करण्यात आली होती.
त्या तक्रारीनुसार त्यांनी तातडीने आपला प्रतिनिधी पाठवून संबंधित ठिकाणचा स्थळ पाहणी करून विनापरवाना रस्तेखोदाई करणाऱ्यांना नोटीस देऊन दोन दिवसात खुलासा करण्यास सांगितले परंतु विनापरवाना खोदाई करणारे व्यक्तींनी एक आठवडा होऊन देखील खुलासा केलेला नाही.
पुणे मनपाचे आयुक्त विक्रम कुमार यांचे स्पष्ट आदेश असताना सुद्धा 30 एप्रिल नंतर कोणालाही रस्तेखोदाई करता येणार नाही अथवा तशी परवानगी दिली जाणार नाही असे परिपत्रक काढले आहे
. तरीसुद्धा स्थानिक प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना हाताला धरून विनापरवाना रस्तेखोदाई करण्याचे धाडस या विद्युत केबल टाकणाऱ्या ठेकेदाराने केले आहे. त्याचप्रमाणे स
.नं
.155 येथे रस्ते खोदाई करण्यात आली आहे. पुणे मनपा मार्फत विकसित केलेल्या रस्त्याची खोदाई करून विनापरवाना केबल टाकण्याची बाब गंभीर स्वरूपाची आहे. पुणे मनपाच्या स्ट्रेचिंग पॉलिसी भंग करणारी आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यामुळे स्ट्रेचिंग गाईडलाईन पॉलिसी नुसार सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा 1984चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा आणि तीन पट दंड आकारावा अशी मागणी रयत विद्यार्थी परिषदेची सचिव रविराज काळे यांनी पत्राद्वारे पुणे मनपा आयुक्तांकडे केली आ
हे.