पुणे : गुजरातचे नेते गोपाल इटालिया यांनी आप महाराष्ट्राचे सह प्रभारी पद घेतल्यावर पक्ष संघटनेमध्ये अनेक बदल केले आहेत. आज पुण्याचे मुकुंद किर्दत यांची आम आदमी पार्टीच्या राज्य प्रवक्ते पदी नेमणूक जाहीर करण्यात आली.
उच्च शिक्षित अभियंते व व्यावसायिक असलेले मुकुंद किर्दत अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळींबरोबर जोडलेले आहेत. स्त्री पुरुष समानता हा त्यांचा विशेष जिव्हाळ्याचा विषय आहे. गेली नऊ वर्षे आप बरोबर कार्यरत असून शिक्षण क्षेत्रात त्यांचे विशेष काम आहे. पुणे महानगरपालिका संबंधित मुख्यत्वे ॲमिनिटी स्पेस, अग्निशमन वाहन घोटाळा, टोल प्रश्न, कंत्राटी भरती आदी प्रश्नांवरती आंदोलने केली आहेत. तसेच २०१९ मध्ये आप तर्फे शिवाजीनगर विधानसभा निवडणुक लढवली आहे. यापूर्वी त्यांनी पुणे शहर व पुणे विभागाची तसेच आप राज्य मीडिया टीमची जबाबदारी सांभाळली आहे.























