नेत्यांच्या वाढदिवसाच्या बॅनरचा खर्च कमी करून जाळीतग्रस्त कुटुंबाच्या घराला मदत

मुळशी : माझी पर्यावरण मंत्री युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे युवासेना यांच्या वाढदिवसानिमित फ्लेक्सचा खर्च कमी करून सामाजिक बांधिलकी जपत वातूंडे ता मुळशी जिल्हा पुणे येथे जळीतग्रस्त कुटुंब सौ. जनाबाई नामदेव कडु यांना दहा हजार रुपये आर्थिक मदत करण्यात आली.

सदर मदत पुणे उपजिल्हासंघटक सचिन दादा दगडे, तालुका संघटक अमित कुडले, तालुका समन्वयक शिवाजी उभे, दामोदर उभे, आशिष वेडे पाटील सचिन मानकर यांच्या हस्ते देण्यात आले सदर मदत सचिन दगडे व अमित कुडले यांच्या वतीने करण्यात आली.

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फ्लेक्स जाहिरातींवर खर्च न करता नागरिकांच्या उपयोगाचे सामाजिक उपक्रम घेण्याचे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत हा उपक्रम घेण्यात आला.

See also  पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा.राम ताकवले यांच्या नातेवाईकांची विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडून सांत्वनपर भेट