मुख्यमंत्री म्हणाले,आमची जोडी जय वीरूची;तर आमच्या प्रवासाची चिंता कोणी करण्याचं कारण नाही – देवेंद्र फडणवीस

पालघर : शिवसेनेने दिलेल्या एका जाहिरातीवरून शिंदे गट आणि भाजपात धम्मचक्री सुरू आहे. दोन्ही गटाचे नेते आपापल्या नेत्यांसाठी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यास तयार झाले आहेत. खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बेडूक म्हणून उल्लेख केल्यानंतर शिंदे गटातील आमदार भाजपवर तुटून पडले आहेत. त्यामुळे महायुतीत आता मोठा भगदाड पडल्याचं चित्र तयार झालं आहे. यातच पालघर येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानातून प्रवास केला आहे. त्यामुळे हा वाद आता निर्वाळा आहे का? असा प्रश्न निर्माण केला जात आहे. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

आमच्यात गेल्या काही दिवसापासून मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. तो खडा आम्ही उचलून बाजूला फेकला. आमचं सरकार लोकांच्या मनातलं सरकार असून काहीही केलं तरी आमच्यामध्ये काहीही निर्माण होणार नाही. गेले पंधरा-वीस वर्षापासून आमची जोडी आहे. मी आमदार होतो, तेव्हापासून आमची दोस्ती आहे. कोणी कितीही प्रयत्न केला तरी काही होणार नाही. दोघांचं बॉण्डिंग मजबुत आहे, हे फेविकॉल का जोड है. तुटेगा नही. काही लोक म्हणतात ही जोडी जयविरूची जोडी आहे. आमच्यातली युती ही खुर्चीसाठी झाली नसून सर्वसामान्यांसाठी झाली आहे. असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझा एकत्रित प्रवास पंचवीस वर्षाचा आहे. पण गेल्या वर्षभरात तो अधिक घट्ट झाला आहे. त्याच्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता कोणी करण्याचं कारण नाही. तो आज, काल आणि उद्यापण सोबत राहिल. कारण आम्ही सरकार खुर्च्या तोडण्यासाठी नाही तर जनसामान्यांच्या जीवनामध्ये सामाजिक, आर्थिक परीवर्तन करण्यासाठी केलं आहे. एखाद्या जाहिरातीमुळे किंवा एखाद्याच्या वक्तव्यामुळे कुठे या सरकारमध्ये काही होईल, एवढं तकलादू सरकार नाही आहे. हे जुनं सरकार आहे. कोणी आधी भाषण करायचं कोणी नंतर भाषण करायचं याच्या करता एकमेकांची गच्ची पकडणारे आम्ही बघितले. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चांगलाच टोला हाणला.

See also  कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैय्याजी यांच्या उपस्थितीत बारामतीत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती सोहळा संपन्न

दरम्यान, वर्षभरापूर्वी सरकार बदललं आणि दोन सरकार मधला फरक काय ?  मागचं सरकार होतं सरकार आपल्या घरी आणि आताच सरकार या सरकार तुमच्या दारी.  हा महत्त्वाचा फरक दोन सरकार बदला आहे.  एक सरकार स्वतःच घरी बसलो होतो आणि हे सरकार मात्र तुमच्या दारामध्ये येऊन तुमचे अधिकार तुमचे लाभ हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करताय. असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.