पीपीएम बालशिक्षण मंदिरात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत

खडकी : नवीन वर्षातील शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांमध्ये जोश आनंद यामध्येच खडकी शिक्षण संस्थेच्या पीपीएम बाल शिक्षण मंदिरात एक आगळा उपक्रम करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल. पीपीएम बाल शिक्षण मंदिराचे अध्यक्ष राजेंद्र भुतडा, ज्येष्ठ संचालक ज्ञानेश्वर मुरकुटे, संचालक मधुकर टिळेकर, बालवाडीच्या प्रमुख शुभांगी बरेल्लु ,वंदना शिवशरण तसेच पालक वर्ग यांच्या समावेत पहिल्यांदाच शाळेत पाऊल ठेवलेल्या मुलांचे स्वागत एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आले. यावेळी मुलांचे पहिले पाऊल कुंकवाच्या ओलाव्याने कागदावर ठसा घेऊन तो कागद त्यांच्या पालकांना संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करून मुलांच्या अंगावर फुलांची उधळण करून तसेच शालेय साहित्य व खाऊवाटप करून मुलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पर्यंत केला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष गोयल साहेब यांनी पालकांना संबोधित करताना सांगितले की आपल्या मुलाचे पहिले पाऊल हे शाळेत आले आहे या कागदाचा ठेवा जतन करून ठेवावा जेणेकरून ज्या वेळेस आपला पाल्य मोठ्या पोस्टवर जाईल तेव्हा त्याला पहिल्या पावलाची पाऊल खूण आठवून देण्यास बहुमोल मदत होईल, पालकांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनिवडी सह शिक्षण दिले पाहिजे. पी .पी .एम . शिक्षण मंदिरात या पुढील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य ,गणवेश, स्कूल बॅग, शूज, वही पुस्तक असतील हे सर्व मोफत दिल्या जाणार आहेत.

See also  एन एस यु आय चे अध्यक्ष अभिजीत गोरे यांचे बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांना निवेदन