महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत पुणेरी बाप्पा संघाची शानदार सुरुवात
पुणेरी बाप्पा संघाच्या ऋतुराज गायकवाड, पवन शहा यांची अर्धशतकी खेळी

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या लढतीत ऋतुराज गायकवाड (64धावा) व पवन शहा (57धावा) याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पुणेरी बाप्पा संघाने कोल्हापूर टस्कर्स संघावर 8 गडी राखून शानदार सुरुवात केली.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडियमवर आजपासून सुरू झालेल्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात महाराष्ट्र रणजी पटू अंकित बावणेच्या 57चेंडूत 72धावांच्या झाजंवती खेळीच्या जोरावर सलामीच्या लढतीत कोल्हापूर टस्कर्स संघाला पुणेरी बाप्पा संघासमोर विजयासाठी 20षटकात 7बाद 145धावांचे आव्हान ठेवता आले.

स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी प्रचंड संख्येने स्टेडियम वर जमलेल्या क्रिकेट शौकिनानी आजचा दिवस गाजवला. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचचे अध्यक्ष रोहीत पवार यांनी नाणेफेक केली. पुण्याचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली.

केदार जाधव (22चेंडूत 25धावा, 3चौकार, 1षटकार) आणि अंकित बावणे यांनी कोल्हापूर संघाला वेगवान सलामी दिली. रोहन दामले याने केदार जाधवला बाद करुन ही जोडी फोडली. त्यानंतर मैदानात उतरलेला एमपीएल मधील सर्वात महागडा खेळाडू नौशाद शेख केवळ 24चेंडूत 20धावा करून तंबूत परतला. त्यानंतर कोल्हापूरचा डाव 2बाद119 वरून अखेर 7बाद 144 घसरला.

पुणेरी बाप्पा कडून पियूष चावला(3-18) आणि सचिन भोसले(3-40) यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.

याच्या उत्तरात पुणेरी बाप्पा संघाने 14.1 षटकात 2बाद 145धावा करुन पुर्ण केले. यात ऋतुराज गायकवाडने 27चेंडूत 5चौकार व 5 षटकाराच्या मदतीने 64धावांची धडाकेबज खेळी केली. त्याला पवन शहाने 48चेंडूत 6चौकार व 1षटकारासह 57धावांची संयमी खेळी करुन साथ दिली. या सलामीच्या जोडीने 61चेंडूत 110धावांची भागीदारी करून संघाच्या विजयाचा पाया रचला. त्यांनतर ऋतुराज गायकवाड श्रेयस चव्हाणच्या गोलंदाजीवर अंकित बावणेने झेल पकडला. यानंतर पवन शहाने सुरज शिंदे(नाबाद 17)च्या साथीत 24चेंडूत 32 धावांची भागीदारी करून संघाला (142धावा)विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. त्यानंतर यश क्षीरसागरने नाबाद 2 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी ऋतुराज गायकवाड ठरला.

See also  कबड्डीला प्रोत्साहन देण्यासाठी निधी उपलब्ध करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

स्पर्धेचा सविस्तर निकाल:

कोल्हापूर टस्कर्स: 20षटकात 7बाद 144धावा(अंकित बावणे 72, केदार जाधव 25;पियुष साळवी 3-18, सचिन भोसले 3-40) पराभुत वि.पुणेरी बाप्पा:14.1षटकात 2बाद 145धावा(ऋतुराज गायकवाड 64, पवन शहा 57; तरनजीतसिंग धिलोन 1-13) by eight wickets.