क्रीडानगरी महाळुंगे बालेवाडी येथे अमोल बालवडकर फाउंडेशन आयोजित योग शिबिरात ३००० नागरिकांचा सहभाग

बालेवाडी : श्री.शिव छत्रपती क्रिडा संकुल बालेवाडी-म्हाळुंगे येथील मुख्य स्टेडियमवर ९ व्या आंतरराष्ट्रीययोग दिनानिमित्त विशेष योग शिबिराचे आयोजन क्रिडा युवकसंचलनालय महाराष्ट्र राज्य व अमोलबालवडकर फाऊंडेशन यांच्या वतीने करण्यात आले होते.


यावेळी जागतिक पुरस्कार विजेत्या योगा प्रशिक्षक पल्लवी कव्हाने व त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील विविध ज्येष्ठ नागरिक संघ व हास्य योग परिवाराचे हजारो सभासद बाणेर रनर्स ग्रुप, क्रिडा प्रबोधनिचे खेळाडु तसेच परिसरातील सोसायटींचे सभासद व बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे परिसरातील ग्रामस्थ असे सुमारे ३००० नागरिक या योग शिबिरात सहभागी झाले होते.


यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर, क्रिडा उपसंचालक सुहासजी पाटील, नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेवक किरण दगडे, शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, प्रभाग अध्यक्षा उमाताई गाडगिळ, अनिलबाप्पु ससार, युवा उद्योजक विक्रम विनोदे, सरपंच मच्छिंद्र कराळे, शशिकांत बालवडकर, रणजित पाडाळे, किरण पाडाळे, नितिन रणवरे, शिवसिंग, रामकुमार मौर्य तसेच क्रिडा व युवक संचलनालयाचे सर्व पदाधिकारी, खेळाडू व अमोल बालवडकर फाऊंडेशन चे सर्व सभासद उपस्थित होते.

See also  वाघोलीतील मूलभूत सुविधासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी – मंत्री उदय सामंत