श्री शिवाजी विद्यामंदिरामध्ये 25 वर्षांनी पुन्हा एकदा भरला वर्ग

औंध : , औंध येथील जनता शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविदयालयात १९९८ – १९९९ मध्ये इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेले माजी विद्यार्थी व शिक्षक 25 वर्ष रौप्य महोत्सवी वर्षाचा योग साधत पुन्हा एकत्र आले.


याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन झाल्यानंतर दिवंगत माजी विदयार्थी व दिवंगत शिक्षकांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.प्रत्येक विद्यार्थ्यांने स्वतःचा परिचय दिला. सर्व शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शॉल,श्रीफळ, आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या शाळेबद्दल कृतज्ञता म्हणून शाळेला शालेय उपयोगी भेटवस्तू दिल्या .प्रत्येक माजी विदयार्थी मित्र मैत्रिणीला सन्मानचिन्ह देण्यात आले. पुन्हा एकदा वर्ग भरवुन सर्वांनी २५ वर्षां पूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला.
या सर्व स्नेहमेळावा कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन एस.एस. सी १९९८ – १९९९ इयत्ता 10 वी अ,ब,क ,आणि ड चे सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी केले होते.

See also  डॉ.कैलास कदम यांची इंटक च्या प्रदेशाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल जाहीर नागरी सत्कार