बाणेर बालेवाडी भागात वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाकडे अधिक ५० ट्रॅफिक वॅार्डनची मागणी

बाणेर : ट्रॅफिकमुक्त बाणेर बालेवाडी अभियान अंतर्गत माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी बाणेर बालेवाडी भागात वाहतुक कोंडी तातडीने सोडविण्यासाठी प्रशासनाकडे अधिक ५० ट्रॅफिक वॅार्डनची केली मागणी.

बाणेर-बालेवाडी भागात मागील काही दिवसांपासुन वाहतुक कोंडीचे प्रमाण अधिक वाढले आहे. याबाबतची तक्रार अनेक करत आहेत. याचीच दखल घेवुन पोलिस निरीक्षक वाहतुक शाखा चतुर्श्रुंगी विभाग बाबासाहेब कोळी साहेब यांना भेटुन या परिसरातील ममता चौक, राधा चौक, गणपती मंदिर चौक बालेवाडी फाटा, ननावरे चौक, बिटवाईज चौक, गणराज चौक, कळमकर चौक या ठिकाणी सकाळी ८ ते दु.१२ व सायंकाळी ५ ते ९ वा. पर्यंत अधिकचे ५० ट्रॅफिक वॅार्डन उपलब्ध करुन द्यावेत, तसेच या भागातील सर्व चौकांमध्ये जास्तीत जास्त वेळ ट्रॅफिक वॅार्डन कार्यरत करुन वाहतुक यंत्रणा सुरळीत करावी अशी मागणी लेखी निवेदन देवुन करण्यात आले.


यावेळी श्री.कोळी यांनी सदर परिसरात ट्रॅफिक वॅार्डन च्या संख्येत वाढ करण्यासाठी पी.एम.आर.डी.ए. मेट्रोचे श्री.राठी यांना संपर्क साधला. यावेळी श्री.राठी यांनी तातडीने या परिसरात ट्रॅफिक वॅार्डन वाढविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर, सुंदरशेठ बालवडकर प्रविण बालवडकर उपस्थित होते.

See also  आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रणांनी आपसात शंभर टक्के समन्वय ठेवावा- विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार