मावळ रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी सुनील पवार तर सेक्रेटरी पदी रेश्मा फडतरे यांची निवड

मावळ : रोटरी क्लब ऑफ मावळचा चौथा पदग्रहण सोहळा सोमाटणे फाटा येथे डी.जी.एन. रोटेरियन संतोष मराठे व तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.

याप्रसंगी रोटेरियन सुनील पवार यांनी अध्यक्षपदाची तर रोटेरियन रेश्मा फडतरे यांनी सेक्रेटरी पदाची धुरा सांभाळली. माजी प्रेसिडेंट एडवोकेट दीपक चव्हाण व पास्ट सेक्रेटरी नितीन घोटकुले यांनी आपला पदभार हस्तांतरित करत नवनिर्वाचित अध्यक्ष व सेक्रेटरी यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नितीन गायकवाड यांना तर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पै.केतन घारे यांना प्राइड ऑफ मावळ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.मावळमध्ये नव्याने सभासद झालेल्या पाच डॉक्टर्सना डॉक्टर्स डे निमित्त सन्मानित करण्यात आले. रोटेरियन नितीन घोटकुले यांनी मागील वर्षातील प्रकल्पासंदर्भात सेक्रेटरी रिपोर्ट सादर केला तर रोटेरियन एडवोकेट दीपक चव्हाण यांनी त्यांच्या कारकिर्दीत मदत करणाऱ्या पंधरा रोटेरियन्सचा विशेष सन्मान केला.पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन रवींद्र घारे यांनी प्रेसिडेंट रोटेरियन सुनील पवार व सेक्रेटरी रोटेरियन रेश्मा फडतरे यांची ओळख करून दिली.रोटेरियन सुनील पवार यांनी येत्या वर्षभरात क्लब तर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पासंदर्भात माहिती देत सर्व रोटेरियन्सचे स्वागत केले रोटेरियन रेश्मा फडतरे यांनी येत्या वर्षात अध्यक्षांच्या सर्व प्रकल्पात सर्व रोटेरियन सहभागी होतील व त्यातून चांगल्या पद्धतीची क्लब बांधणी होईल असा विश्वास व्यक्त केला. यावर्षी रोटरी परिवारात नव्याने दाखल झालेल्या 28 रोटेरियंसला पिनप करण्यात आले. रोटेरियन एन.के.पाटील यांनी आपल्या मनोगतात तळेगाव दाभाडे नगरपालिका घेत असलेल्या अनेक उपक्रमात रोटरी मावळचा सहभाग असेल अशी ग्वाही दिली. डीजीएन रोटेरियन संतोष मराठे यांनी रोटरी क्लब ऑफ मावळला शुभेच्छा देत येणाऱ्या कार्यकाळात उत्तम असे प्रकल्प या क्लबच्या माध्यमातून राबविले जातील असा विश्वास व्यक्त केला.या पदग्रहण सोहळ्यासाठी रोटरी क्लब ऑफ तळेगाव,रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी, इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव,लायन्स क्लब ऑफ तळेगावचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटेरियन विजय कुलकर्णी यांनी तर आभार रोटेरियन रेश्मा फडतरे यांनी मानले.

See also  मांग गारुडी समाजाच्या मागण्यांबाबत अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश