पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नवीन ब्लॉक अध्यक्ष यांच्या नियुक्त्या

पुणे : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नवीन ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. शहराध्यक्ष अरविंद शिंदे व विविध मान्यवर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

येरवडा ब्लॉक – रमेश सकट
मार्केट यार्ड ब्लॉक – रमेश सोनकांबळे
भवानी ब्लॉक – सुजीत यादव
पुणे कॅन्टोन्मेंट – आसिफ शेख
शिवाजीनगर ब्लॉक – अजित जाधव
पर्वती ब्लॉक – संतोष पाटोळे
हडपसर ब्लॉक – बळिराम डोळे
बोपोडी ब्लॉक – विशाल जाधव
पं.नेहरु स्टेडियम ब्लॉक – हेमंत राजभोज
कोथरूड ब्लॉक – विंद्र माझिरे
कसबा ब्लॉक – अक्षय माने
यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड,माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर,माजी आमदार दिप्ती चवधरी,माजी नगरसेविका लता राजगुरू,माजी नगरसेवक दत्ता बहिरट, महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्षा संगीता तिवारी,माजी महापौर कमल व्यवहारे, उपाध्यक्ष बाळासाहेब दाभेकर,माजी नगरसेवक अजित दरेकर,माजी नगरसेवक मुख्तार शेख, प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य महेबुब नदाफ आदी मान्यवर व जुने ब्लॉक अध्यक्ष काॅंग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  पुणे जिल्ह्यातील युरिया व डीएपी खताचा संरक्षित साठा मुक्त