लिफ्टच्या बहाना करून मुलींची छेडछाड करणाऱ्याला चतु:शृंगी पोलिसांनी केली कारवाई

पुणे : पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी सुरू केलेल्या महिला हेल्पलाइन वर एस बी रोड वरती एका अज्ञात इसमाने लिफ्टचा बहाना करून मुलीशी छेडछाड केल्या बाबत माहिती प्राप्त झाली होती. सदर माहितीचा पाठपुरावा करून चतुशृंगी पोलीस स्टेशनचे तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित इसम अनुप प्रकाश वाणी वय 44 वर्ष राहणार शनिवार पेठ पुणे यास शोध घेऊन ताब्यात घेतले.

हेल्पलाइनवर संदेश पाठवणाऱ्या पिढीतेच्या मैत्रिणीशी संपर्क साधून पीडित मुलीस धीर देऊन तिच्या फिर्यादीवरून चतुशृंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद क्रमांक 475/2023 कलम 354 भादवी सह कलम 8,12 बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला व नमूद गुन्ह्यात आरोपीस अटक केले आहे. आरोपीचे चौकशीमध्ये आरोपीने अशाच प्रकारे आजारी असल्याचा बहाणा बनवून रस्त्याने जाणाऱ्या मुलींकडून लिफ्ट घ्यायच्या बहान्याने अशा मुलींचे विनयभंग करण्याच्या अनेक घटना शिवाजीनगर, डेक्कन, अलंकार, चतुशृंगी परिसरात केले असल्याची कबुली दिली. सदर बाबत माहिती मिळाल्याने अनेक पीडित मुली तक्रार देण्यासाठी समोर येत आहेत. त्यांच्या तक्रारी दाखल घेऊन पुढील कारवाई करीत आहोत असे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितले.

See also  एकही शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेत राहणार नाही यादृष्टीने नवीन आराखडे तयार करा- अजित पवार