सर्वसामान्य नागरिकाच्या कामांसाठी शासनाकडे पाठपुरावा करु. – बाळासाहेब चांदेरे

मुळशी : डोंगरी भागातील भोर मुळशी वेल्हा तालुक्यांच्या विकासासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा करुन विकासासाठी काम करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख मा सभापती बाळासाहेब चांदेरे यांनी केले.

कासारआंबोली (ता.मुळशी ) येथे ग्रामपंचायत व मुळशी तालुका अपंग कल्याण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कासारआंबोली गावातील जिल्हा परिषद शाळेतील गरजु गरिब विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू व वह्या वाटप करण्यात आले यावेळी चांदेरे बोलत होते.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख मुळशी पंचायत समितीचे मा.सभापती बाळासाहेब चांदेरे उपजिल्हा प्रमुख संतोष तोंडे,महिला आघाडी जिल्हा संघटिका कांताताई पांढरे,शिवसेना तालुका प्रमुख दिपकआबा करंजावणे,कृषिउत्पन्न बाजार समितीचे संचालक रामभाऊ गायकवाड, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे,उपजिल्हाप्रमुख स्वप्निल सातपुते,शिवसेना उपतालुका प्रमुख अक्षय आमराळे,विकास खैरे,कासारआंबोली गावचे सरपंच उमेश सुतार,उपसरपंच पुजाताई सुतार,मा.सरपंच सचिन धुमाळ,सुवर्णाताई मारणे,छायाताई भिलारे,मा.उपसरपंच स्वप्निल कांबळे,ग्रामपंचायत सदस्य शंकर सुतार,प्रितीताई सुतार,माधुरीताई धुमाळ,ग्रामसेवक क्षीरसागर भाऊसाहेब,सामाजिक कार्यकर्ते जोतिबा पाडाळे,अपंग कल्याण संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव भेगडे,संचालक चंद्रकांत सुतार,हरिभाऊ पडळघरे,उमेश भुकनकर,युवानेते शैलेश पांढरे,सागर धुमाळ,जिल्हा परिषद शाळेतीचे विद्यार्थ्यी,शिक्षक,पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

See also  प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने जी-२० बैठकीचे आयोजन यशस्वी करावे-उपायुक्त वर्षा लड्डा-ऊंटवाल