कोथरूड राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे पोलीस वीरांचा सन्मान गिरीश गुरनानी यांच्याकडून सत्कार

कोथरूड : अनेक वर्षे शोध घेत असलेल्या देशद्रोह्यांना सजगतेने बेड्या ठोकुन आपल्या कर्तव्याची कामगिरी बजावणाऱ्या तीन वीर पोलीस बांधवांचा सत्कार आज कोथरूड युवक राष्ट्रवादीच्या गिरीश गुरनानी यांच्या कडून करण्यात आला.

कोथरूड येथे गस्त घालत असताना पोलीस अंमलदार प्रदीप चव्हाण, अमोल नझन आणि मंगेश शेळके यांनी NIA या राष्ट्रीय तपास यंत्रणांसाठी ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवादी इम्रान खान आणि युनूस साकी यांना कोथरुड परिसरात पकडले. त्यांच्या या कामगिरी मुळे पुणे पोलिसांच्या मान वाढलाच आहे आणि या तिघांचे सर्वत्र कौतुक ही होत आहे. अश्यातच राष्ट्रवादी काँग्रेस ने देखील या युवा पोलिसांचा सन्मान केला आहे असे गुरनानी यांनी सांगितले.

“कोथरूड मध्ये एवढे कर्तबगार पोलीस अधिकारी कर्तव्य बजावतात म्हणूनच कोथरूडकर आपापल्या घरात सुरक्षित आहे आणि रस्त्यावर निर्धास्त वावरू शकतात. अश्या अधिकाऱ्यांमुळे नागरिक सुखरूप दैनंदिन कऱ्य बजावू शकतात आणि प्रभागला व पर्यायाने देशाला प्रगतीपथावर नेण्यास हातभार लागतो” असे यावेळी गिरीश गुरनानी यांनी सांगितले.

See also  आय. टी. आय. भोर येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर