राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे नियुक्ती झाल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विशेष सत्कार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची कोथरुडमधील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी मानकर यांची शहराध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल विशेष सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर हे देखील उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना भेट देण्यात आला.

राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या गटाचे शहराध्यक्ष म्हणून दीपक मानकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. यामुळे कोथरूड मतदार संघामधील राजकीय समीकरणे देखील बदलली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर देखील याचा प्रभाव पडणार आहे.

See also  सैनिक कल्याण विभागात करार पद्धतीने विधी सल्लागार नेमणुकीसाठी अर्ज करण्याचे आवाहन