धानोरी जकात नाका रोडवरील खड्डे त्वरित दुरुस्ती करा – आम आदमी पार्टी

धानोरी : धानोरी जकात नाका रोड वर अनेक मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत.परंतु याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते. यामुळे खड्ड्यांमध्ये झाड लावून प्रशासनाचा आम आदमी पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.


याठिकाणी खड्ड्यांमुळे ट्रॅफिक ची समस्या उद्भवत आहे. खड्ड्यांमुळे वाहतूक संत गतीने होत आहे. कोणत्याही उपाययोजना नागरिकांना केलेल्या दिसत नाही. पुणे महानगरपालिकेच्या या परिसरातून १५० कोटी रुपये टॅक्स स्वरूपात दरवर्षी मिळतात. पण त्याप्रमाणात सरकारकडून कोणतीही सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. धानोरी या परिसरातील डी. पी. रोड अनेक वर्षांपासून केले जात नाही. यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. आम आदमी पक्षाचे अमित म्हस्के यांच्या नेतृत्वात धानोरी येथे खड्ड्यामध्ये प्रतीकात्मक बोट सोडून व झाडे लाऊन सरकारचा निषेध करण्यात आला.प्रशासनाने त्वरित यावर उपाययोजना कराव्यात तसेच परिसरातील खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी आम आदमी पार्टी चे अविनाश भाकरे, मनोज शेट्टी, श्रद्धा शेट्टी, सुरज बिराजदार, अक्षय म्हस्के,संजय कोणे, शिवाजी डोलारे, संजय कटारणवरे, अक्षय दावडिकर, जोगिंदर पाल तुरा, मिलिंद ओव्हाळ, मंजुनाथ मनुरे,संदीप सुर्यवंशी, गणेश तरलेकर यावेळी उपस्थित होते.

See also  वनमहोत्सवादरम्यान सामाजिक वनीकरण विभागातर्फे सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा