इरशाळवाडीसाठी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून 11 लाख रूपयांच्या मदतीचा धनादेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धनादेश सुपूर्द

मुंबई : मागील आठवड्यात रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इरशाळवाडी येथे दरड कोसळून अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडुन देण्यात येणारी मदत तसेच जखमींच्या उपचारावर होणारा खर्च शासन करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.

उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या दुर्घटनेतील मृत व जखमी व्यक्तींच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला वैयक्तिकरित्या व लोकसहभागातून मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज विधान भवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एकूण 11 लाखाचे धनादेश सुपूर्द केले आहेत.

यामध्ये मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी वैयक्तिकरित्या एक लाख आणि लोकसहभागातून दहा लाख रुपयांची मदत दिली आहे.
त्यात अनुक्रमे संवेदना सोशल फाऊँडेशन-कोल्हापूर, सावली सेवा फाऊँडेशन-पुणे, पुनर्निमाण सोशल फाऊँडेशन-पुणे, युवा स्वराज्य प्रतिष्ठान-पुणे या संस्थांकडुन प्रत्येकी रुपये दोन लाख आणि आई प्रतिष्ठान-सोलापूर व चैतन्य प्रतिष्ठान-मुंबई या संस्थांकडुन प्रत्येकी एक लाख असे एकुण रुपये 11 लाखाचे धनादेश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याकडे देण्यात आले आहेत.

See also  लोकसभा निवडणुकीसाठी नागपूर जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्जरामटेकमध्ये २४०५ तर नागपूरमध्ये २१०५ मतदान केंद्रे