बाणेर येथे ACP कडुन पत्नी अन पुतण्याची हत्या; नंतर स्वतःलाही संपवले

पुणे : पुण्यात बाणेर येथे राहणारे एका बड्या पोलीस अधिकार्याने स्वतःच्या पत्नीची आणि पुतण्याची पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान हत्या केली आहे. या हत्याकांडानंतर त्यांनी स्वतःलाही संपवलं आहे.

या घटनेनं एकच खळ्बळ उडाली आहे. भारत गायकवाड असं सदर पोलीस अधिका्याचे नाव असून ते अमरावती पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त आहेत.

पुणे शहरातीत चतुश्रुंगी परिसरात भारत गायकवाड यांनी त्यांची पत्नी मोनी आणि पुतण्या वकील दीपक याच्यावर गोळीबार करून हत्या केली आणि त्याच पिस्तुलातून स्वतःवर सुद्धा गोळी
झाडून घेतली. पहाटे चार वाजण्याच्यासुमारास ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. संपूर्ण प्रकारांची माहिती चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते.तर त्यांचे कुटुंबीय पुण्यात लक्ष्मण नगर बाणेर येथे वास्तव्याला होते.

हत्या करताना गायकवाड यांनी घरातील मुले, आई यांनी दुसऱ्या खोलीत पाठवले होते. यानंतर खोलीचा दरवाजा लावून पत्नीचे गोळी झाडून हत्या केली. गोळीचा आवाज ऐकून घरात असलेला पुतण्या तातडीने खोलीकडे पळाला व त्याने दरवाजा उघडला यावेळी भरत गायकवाड यांनी त्याच्या दिशेने देखील गोळी झाडली.व त्याची हत्या केली. यानंतर स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली.

भारत गायकवाड आपल्या पत्नीची आणि पुतण्याची हत्या करून नंतर स्वतःची आत्महत्या का केली? यामागे नेमकं काय कारण होते? है आद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करतआहेत.

See also  पुणे येथे 4 अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये