जागतिक टपाल दिनानिमित्त कोथरूड येथील पोस्ट ऑफिस मध्ये पोस्टमन व कर्मचाऱ्यांचा सत्कार

पुणे : राजीव गांधी पंचायत राज संघटन कोथरूड काँग्रेसच्या वतीने जागतिक टपाल दिनानिमित्त कोथरूड येथील पोस्ट ऑफिस मध्ये पोस्टमन व कर्मचारी यांचे सत्कार करण्यात आला .

यावेळी पोस्ट मास्तर संदीप मोठे, राजीव गांधी पंचायत राज संघटन अध्यक्ष किशोर मारणे, कोथरूड कोंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र माझीरे, प्रभाग समिती सदस्य कानु साळुंखे, शिवाजी सोनार, बंटी जाधव, हनुमंत गायकवाड, सोमनाथ पवार , भिसे काका, आकाश देवकुळे, रंजना पवार, पुजा चव्हाण इत्यादी उपस्थित होते. यावेळी पोस्टमन यांचे सत्कार किशोर मारणे व रवींद्र माझीरे यांच्या हस्ते करण्यात आले पोस्टमन सत्कार केल्या नंतर त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

See also  गांधी जयंतीला कंत्राटी भरती, समूह शाळा आणि दत्तक शाळा आदेश मागे घ्या: आप ची मागणी