कोथरूड : महात्मा गांधी यांच्या बद्दल चुकीचे विधान केल्या प्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर्ती गुन्हा दाखल व्हावा असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभेच्या वतीने कोथरूड पोलीस स्टेशन चे सिनिअर पी आय हेमंत पाटील यांना देण्यात आले आहे.कोथरूड विधानसभा युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले आणि कठोर कारवाही ची मागणी करण्यात आली.
संपूर्ण भारत देशाचे गौरव असलेले महात्मा गांधीजी ज्यांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष केला,अशा या महापूरशाबाबत बेताल वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे. संभाजी भिडे यांनी आताच नव्हे तर असे बऱ्याचदा महपूर्षांवर्ती व महिलांवरती बेताल वक्तव्य करून देशात अशांती निर्माण करण्याचे प्रयत्न केला आहे असे गुरनानी म्हणाले. त्यातच त्यांनी जे आपले महापुरुष म्हणून आपण ज्यांना संबोधित करतो असे आपले बापू म्हणजेच महात्मा गांधी यांचा अपमान केला आहे.हा फक्त महात्मा गांधीचाच अपमान नसून संपूर्ण भारत देशाचा अपमान आहे असे निवेदनात गिरीश गुरनानी यांनी म्हंटले आहे.
या अपमानास्पद वत्व्यामुळे संभाजी भिडे यांच्यावर कलम ५०४,५०५ व २६८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा असे निवेदनात गुरनानी यांनी म्हंटले आहे. संभाजी भिडे यांच्यावरती त्वरित कारवाही करावी जेनेकरून यापुढे कोणीही कुठल्याही प्रकारचे महापुरुषांबद्दल अपमानास्पद शब्दांचा वापर करून, समाजामध्ये आणि नागरिकांमध्ये तेढ निर्माण होणार नाही.
या वेळी राष्ट्रवादी युवकचे अमोल गायकवाड,ऋषेकेश शिंदे,तेजस बनकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.