मॉडर्न महाविद्यालय गणेश खिंड याच्या माजी विद्यार्थ्यांकडून पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांचा सत्कार

पिंपळे निलख : पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक तुषार कामठे यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या मॉडर्न विद्यालय गणेशखिंड शाळेतील वर्ग मित्रांनी त्यांचा विशेष सत्कार करून शुभेच्छा व्यक्त केल्या.

मॉडर्न विद्यालय गणेशखिंडच्या सन ९८ मधील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने माजी नगरसेवक तुषार कामठे यांचा पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शाल पुष्पगुच्छ तसेच पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी आपल्या वर्गातील विद्यार्थी मित्र शहराचे प्रतिनिधित्व करत असल्याचा आनंद या स्नेह मेळाव्यामध्ये व्यक्त करण्यात आला.
यावेळी निलेश सायकर, राहुल गोडसे, गणेश दरेकर, रुपेश तांबीटकर, प्रवीण आमले, अमोल नेटके, केदार कदम, मनोज धायगुडे, चेतन पायगुडे, संदीप गायकवाड, आदेश म्हेत्रे, प्रकाश गोगावले, दिलीप सावंत, आतुल वेडे आदी उपस्थित होते.

See also  संभाजी ब्रिगेड शहर पदाधिकाऱ्यासोबत स्वारगेट वाहतुक कर्मचाऱ्याची दादागीरी