” जैन विचार मंच ” व ” अरिहंत जागृती मंच ” च्या वतीने जैन बांधवांकडुन काँ . अण्णा भाऊ साठे यांस विनंम्र अभिवादन !

पुणे : ” पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसुन ती श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे .” असा जगाला महान संदेश देणारे साहित्यरत्न लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त ” जैन विचार मंच ” व ” अरिहंत जागृती मंच ” च्या वतीने सारस बागेजवळील काँ.अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास जैन विचार मंचचे निमंत्रक , जेष्ठ साहित्यिक , विचारवंत विठ्ठल साठे व अरिहंत जागृती मंच चे अध्यक्ष मा.राजेंद्रजी सुराणा सर यांच्या शुभहस्ते मोत्याची माळ अर्पण करुन अभिवादन करण्यात आले .

यावेळी अ.जा.मं.चे मा.श्रीपालजी ललवानी ,मा.विजयजी पारख , जैन विचार मंचचे सचिव , मा.शंकरजी वाघमारे , सदस्य , मा.राजेंद्रजी भोंडवे , मा.पांडुरंगजी दुबळे , मा.राजेंद्रजी अडागळे , मा.सनि भोंडवे , मा. संतोषजी भोंडवे , मा.प्रतिकजी कांबळे , मा.सोमनाथजी कानडे , मा.दत्ताजी महापुरे इत्यादी प्रमुख कार्येकर्ते उपस्थित होते .

See also  टेनिक्वाईट (रिंग टेनिस) जागतिक स्पर्धा प्रशिक्षण शिबीरामध्ये पुण्याचे प्रथमेश ढवळे, साहिल खेडेकर, प्रणव पाटील आणि सिध्दि जाधव यांची निवड