इंडियन डेंटल असोसिएशन, पुणे ( वेस्ट ) २०२६ ची कार्यकारणी जाहीर, डॉ. बालाजी सदाफुले यांची अध्यक्षपदी निवड

औंध – पुणे येथील नामांकित अशा इंडियन डेंटल असोसिएशन पुणे वेस्ट ची २०२६ ची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. डॉ. बालाजी सदाफुले यांची अध्यक्ष म्हणून उत्साहात निवड करण्यात आली. सचिवपदी डॉ सुकेशिनी घिवारे यांची , भावी अध्यक्ष डॉ पल्लवी जाधव, खजिनदार म्हणून डॉ साकेत आर. यांची निवड करण्यात आली.

डॉ. बालाजी सदाफुले हे गेली १६ वर्षे बाणेर येथे दंतवैद्येकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.यावेळी असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष
डॉ. अजित कदम, प्रमुख पाहुणे डॉ मनोज नायर , असोसिएशनच्या मावळत्या अध्यक्षा डॉ मोनिका दहिवेलकर , सदस्य डॉ मिनल सपाटे, डॉ विद्या पंडित,डॉ. वैभव तोराडमल,  डॉ. हरीश सोनार , व इतर सदस्य उपस्थित होते. हा कार्यक्रम ‘हॉटेल सयाजी ‘वाकड येथे आयोजित करण्यात आला होता.

See also  पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस