स्वातंत्र्य दिनी उच्च कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन द्वारा सत्कार

बालेवाडी : स्वातंत्र्य दिन सोहळ्यात, बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनने बाणेर बालेवाडी परिसरातील उच्च कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार केला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कर्नल मिलिंद रानडे होते तर पाहुणे म्हणून भारतीय क्रिकेट संघात खेळलेले फास्ट बॉलर पांडुरंग साळगावकर होते. पाहुण्यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन फेडरेशनच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले.

सर्व खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पैलवान शिवराज अनिल बालवडकर – कुस्ती, मुकुंद सोळंकी- पर्वातारोहण, सक्षम रतन- ईस्पोर्ट फुटबॉल, कोणार्क इंचेकर – बॅडमिंटन, पलश रूपचंदानी-टेनिस, निकिता आगे -क्रिकेट, सावरी शिंदे – पॉवर लिफ्टिंग, श्रेयस्त मंडाला – नेमबाजी , श्वेता आवाड – तलवारबाजी, सिद्धांत मांडगे – स्केटिंग, जयराज भिरूड – कराटे, सुयोग तापकीर -आईस स्केटिंग, स्वराज भोंडवे – एअर पिस्तूल शूटिंग, तनिष्का लोणकर – रायफल शूटिंग या खेळाडूंना सन्मानित केले.

See also  सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित "महिला सशक्तीकरण" आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 योगदिन उत्साहात साजरा.