सुसरोड बाणेर विकास मंचच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट

बाणेर : सुस रोड बाणेर विकास मंच च्या वतीने नागरिकांचा सुप्रीम कोर्टात सुरू असलेला लढ्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून होत असलेले प्रयत्न यासाठी पालकमंत्र्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच परिसरातील विविध प्रश्न यावेळी सोडवण्याची मागणी केली.

यावेळी सुसरोड बाणेर विकास मंचचे अध्यक्ष विनय देशपांडे, सचिव हरीश पाटील, उपाध्यक्ष सरला शिंदे, श्री राशनकर, वैभव मोहोळकर आदी उपस्थित होते.

सुस रोड बाणेर परिसरातील कचरा प्रक्रिया प्रकल्प हलवण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये विकास मंचाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. तसेच या परिसरातील विविध प्रश्न सातत्याने सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांना आवश्यक असलेली मदत देण्याचे आश्वासन यावेळी दिले.

See also  आमदार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन