बाणेर येथे डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला माजी कृषिमंत्री शिवसेना उपनेते शशिकांत सुतार यांची भेट

बाणेर : महारष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री शिवसेना उपनेते शशिकांत सुतार यांनी ज्येष्ट शिवसैनिक डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.

यावेळी शिवसैनिक दिलीप मुरकुटे यांनी स्वागत करताना सांगितले की, जनसामान्यांचे नेतृत्व म्हणून शशिकांत भाऊंनी नेहमी समाजासाठी काम केले. कोथरुड चा कायापालट करण्यात भाऊंचा मोठा हात होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वीराज सुतार हे आमदार म्हणुन निवडून येतील याची खात्री आहे. आम्ही शिवसैनिक म्हणुन त्यांच्या सोबत असणार आहे

यावेळी माजी नगरसेवक तानाजी निम्हण यांनी सांगितले की, सर्वसामान्य कार्यकर्त्याला शशिकांत भाऊंनी नेहमी ताकत दिली. मंत्री म्हणून भाऊंनी कोथरुडचा विकास केला. आज त्यांच्या चिरंजीव राजकारणात भाऊंचा आदर्श समोर ठेऊन काम करत आहे. महाविकास आघाडीचा भक्कम उमेदवार म्हणून ते विजयी होतील.

यावेळी शशिकांत सुतार म्हणाले, माझा राजकीय जन्म शिवसैनिक म्हणुन झाला व अंत देखील शिवसेनेत होईल. शिवसेना प्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ दिले. कोथरुड परिसराची विकासमय दिशा ठरवत विकासाच्या बाबतीत कोथरुड चे नाव जागतिक पातळीवर नेऊन ठेवले. पुढे देखील चिरंजीव पृथ्वीराज उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली समाजाचे काम करत आहे. समाजाचे केलेले काम आणि पक्षाची केलेली बांधणी पाहता मिळालेल्या संधीचे सोने होईल.

यावेळी पाषाणचे माजी नगरसेवक तानाजी निम्हण, अंकुश तिडके माजी नगरसेवक, राम गायकवाड, रखमाजी पाडाळे, शशिकांत दर्शने, संतोष भोसले आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील खेळणी दुरुस्त शिवसेनेने दिले अनोख्या स्टाईलने पत्र