कात्रज भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे शालेय विद्यार्थ्यांना सायकलीचे मोफत वाटप

कात्रज : शिक्षणाची तळमळ असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याचा वेळ वाचण्यासाठी भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, शांतता कमिटी, लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज, आणि परिसरातील सामाजिक संस्थानच्या वतीने सायकलचे मोफत वाटप करण्यात आले.

15 ऑगस्ट चे अवचित्य साधून मिळालेल्या या अनोख्या भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी सायकल बँक हा नवीन उपक्रम सुरू केला आहे.

विजय कुंभार म्हणाले, तुमच्या घरी वापरात नसलेली आणि वर्षानु वर्ष घरात पडून असलेली सायकल कोणत्यातरी गरजूंच्या कामी येईल म्हणून जुनी सायकल आम्हाला द्या अशी आव्हान त्यांनी केले .त्याला नागरिकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक अडवोकेट दिलीप जगताप लायन विठ्ठलराव वरुडे पाटील जितेंद्र मुकादम विजय नलावडे पोलीस ठाण्यामधील अधिकारी कर्मचारी शांतता कमिटी सदस्य महिला दक्षता समिती सदस्य पोलीस खात्यातील निवृत्त कर्मचारी जेष्ठ नागरिक पत्रकार उपस्थित होते

See also  बाणेर येथील नाले सफाई व ड्रेनेज लाईनच्या कामाची पाहणी