सावित्री महिला बचत गटाने राबविले आरोग्य शिबिर;
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बाणेर: बाणेर गावात नाईक नवरे कॅम्प येथे सावित्री महिला बचत गटाने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन सावित्री महिला बचत गटांनी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी पूनम विधाते, सावित्री महिला बचत गटातील अध्यक्षा मनिषा पुजारी, उपाध्यक्ष कोमल लोणकर, वर्षा हंबीरराव, सविता जगताप, शायद पठाण, मीना भांडवलकर नेहा साळवे, वैशाली कांबळे, मनीषा शिंदे उपस्थित होत्या.
तर अहिल्या महिला बचत गटाचे अध्यक्षा साजना जाधव, महिला सदस्य उपस्थित होत्या.
सिंबायोसिस मेडिकल कॉलेज आणि सिंबायोसिस हॉस्पिटल, लवळे, मुळशी येथील कम्युनिटी मेडीसिन विभागप्रमुख डॉ. रेश्मा पाटील यांच्या सहकार्याने डॉ. सौरभ मुलाणी, बालरोग विभाग,आणि मेडिकल सामाजिक कार्यकर्ते आरती थोरवे, प्रीती नरवाडे, महादेव सोनावणे यांनी आरोग्य तपासणी केली आहे.


सदरील शिबिर लहान मुलांसाठी ठेवण्यात आले असून यात वयोगट 8 ते 16 वर्षसाठी होते. तर सध्या लहान मुलांमध्ये डोळे येण्याचे लक्षणे आढळून येत असल्याने त्यावर विशेष तपासणी करण्यात आले. तसेच जनरल हेल्थ तपासणी केली असून सुमारे 37 मुलांचे तपासणी करण्यात आले.

See also  गणेश भक्तांच्या मदतीला माय माऊली धावली