केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पश्चिम क्षेत्रिय परिषदेच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेले मुद्दे

गांधीनगर: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील गांधीनगर (#अहमदाबाद) येथे पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच गुजरात आणि गोव्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित राज्याचे प्रशासक, मुख्य सचिव मनोज सौनिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. नदी जोड प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी याचा योग्य वापर करण्यासाठी केंद्राकडून मदत हवी तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचा निर्णय लवकरच घ्यावा.

डहाणू ते #सिंधुदुर्ग हा कोस्टल रोड गोवा आणि गुजरात राज्यांशी जोडल्यास राज्यातील पर्यटन वाढीस लागून सागरी किनारा सुरक्षेच्या दृष्टीनेही फायदा होईल. नाफेड मार्फत होणारी कांदा खरेदी अधिक प्रभावीपणे होण्यासाठी खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी.

तिलारी सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गोवा राज्यासोबत समन्वयाने काम करीत असून मुख्यमंत्र्यांसोबत बैठकही झाली आहे. नवीन बंदरे धोरण, माहितीतंत्रज्ञान धोरण आदींच्या माध्यमातून महाराष्ट्राला आघाडीवर नेत आहोत.- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

See also  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत शिष्टमंडळाने मणिपूर मध्ये पीडितांची भेट घेत पाहणी केली.