माळेगाव शेडगेवाडी रोड वरील साकव पुलाची दुरावस्था शिवसेनेच्या वतीने दुरुस्तीची मागणी

मुळशी : मुठा खोऱ्यातील माळेगाव शेडगे वाडी रोड वरील साकव पुलाची दुरावस्था झाली आहे. तर कोणावरील मोठ्या खड्ड्यात मध्ये पाणी साठत असल्याने जुन्या काळातील हे साकव पुल असून हे आत्ता जीर्ण झाले आहेत. तसेच पावसाळयात मोठ्या प्रमाणात यावर खड्डे पडतात त्यामूळे मोठ्या प्रमाणात पाणी साठून ग्रामस्थांची वाहतुकीची अडचण होते रात्री प्रवास करताना ग्रामस्थ त्रस्त होतात. या विभागात मुठा नदी वाहते या नदीवर कातवडी, माळगाव, शेडगेवाडी, वातुंडे, वांजळे, एवढी गावे असून कातवडी या ठिकाणीं नीळकांठेश्वर हे देवस्थान असून या ठिकाणीं देखील पुल होणे ही गरज आहे.

याबवत संबधीत प्रशासकीय अधिकारी यांनी दखल घ्यावी नाहीतर मोठी दुर्घटना घडू शकते सदर साकव पुल नवीन व मोठा बांधावा अशी मागणी शिवसेना तालुका संघटक अमित कुडले, शिवाजी ऊभे, उपतालुका प्रमुख तानाजी हलंदे , लहू तिकोने,विभाग प्रमुख माऊली साळेकर, श्याम येनपुरे, समीर शिंदे ओंकार मारणे राणीताई शिंदे, बाळा साहेब चोरगे, शिवजी गुंड ,नंदू भरेकर, अमित मारणे धनंजय पासलकर, सागर येणपुरे, यांच्या वतीने करण्यात आली आहे.

तसेच या पुलावरून धोकादायक पद्धतीने वाहने चालवावी लागत आहेत. पुलाच्या सुरक्षा कठड्याची देखील दुरावस्था झाली आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण होत असून पुल अतिशय अरुंद असल्याने एकावेळी फक्त एकच गाडी जाण्यासाठी जागा राहत असल्याने पुलाचे रुंदीकरण देखील होणे आवश्यक आहे.

See also  लांडेवाडी येथे ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन