” पुणे शहर जिल्हा कांग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या शहराध्यक्ष पदी समीर मोहीद्दीन शेख यांची निवड “

पुणे : पुणे शहर जिल्हा कांग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या शहराध्यक्ष पदी समीर मोहीद्दिन शेख यांची नुकतीच निवड करण्यात आली.

सदर निवड अखिल भारतीय कांग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार इम्रान प्रतापगढी यांच्या आदेशाने महाराष्ट्राचे प्रभारी मोहमंद अहमद खान यांनी केली आहे. समीर शेख यांनी पुणे शहरातील वडगावशेरी विधानसभा अध्यक्षपदी 8 वर्षे काम केले आहे. दि मुस्लिम को-आपरेटीव्ह बॅंकेच्या संचालकपदी कार्यरत असून युनिव्हर्सल अमन फौंडेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

या निवडीबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष मा. वजाहत मिर्झा आणि पुणे शहर कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी समीर शेख यांचे अभिनंदन केले आहे.

See also  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते चिवरदान व धम्मदान अर्पण