बाबुराव सणस क्रीडा संकुलामध्ये खेळाडूंसाठी होस्टेल्स व ऑफिस उपलब्ध करून देण्यात यावे -अरविंद शिंदे

पुणे : पुणे शहरातील खेळाडू साठी बांधलेले निवासी होस्टेल बाबुराव सणस क्रीडा संकुल मधील हे मेडिकल कॉलेज पंतप्रधान अटल जी बिहारी कॉलेज मधील मेडिकल चे विद्यार्थी ना देण्यात आले आहे ते ताबडतोब खाली करून खेळाडू साठी उपलब्ध करून दयावे अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

तसेच दुसरी इमारत पर्वती निवडणूक कचेरीला देण्यात आली आहे. यामुळे पुणे शहरातील खेळाडूंना राहण्यासाठी असलेल्या जागेचा वापर अन्य कारणासाठी होत असल्याने खेळाडूंवर अन्याय होत आहे. बाहेर गावाहून पुणे शहरात शालेय व विद्यापीठांमध्ये आलेल्या खेळाडूंना राहण्यासाठी असलेल्या या वास्तूंमध्ये खेळाडूंना जागा मिळत नसल्याने विविध स्तरावरील स्पर्धेच्या संयोजकांना खेळाडूंची व्यवस्था बाहेरील खाजगी हॉटेल्स मध्ये करावी लागते. याचा नाहक आर्थिक बोजा स्पर्धा आयोजकांवर पडत असतो. खेळाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या या वास्तूमध्ये खेळाडूंसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केली. यावेळी शहर क्रीडा व युवक अध्यक्ष आशुतोष शिंदे, माजी नगरसेवक राजपाल घेलोत , रिटायर्ड डि वाय स पी अनिल पवार उपस्थित होते.

यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबत माहिती घेऊन तातडीने कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.

See also  शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने कुस्ती मैदानाच्या आयोजन