बाणेर मुख्य रस्त्यावर येणारे सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

बाणेर: बाणेर गावठाण शिवस्पर्श चौक जवळ मुख्य रस्त्यावर ड्रेनेज मधून सांडपाणी वाहत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण झाली असेल नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.

बाणेर गावठाणा जवळ गेले तीन महिने पुणे महानगरपालिकेच्या ड्रेनेज मधून सांडपाणी वाहत असल्याने मुख्य रस्त्यावर याचा त्रास सहन करावा लागत आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रिय कार्यालयाला वारंवार कळवून देखील याबाबत योग्य उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.

गावठाणातील सांडपाणी वाहून नेणारी गटाराची लाईन मधून पाणी वहात सावता माळी मंदिराच्या जवळ जात असल्याने या परिसरात येणाऱ्या भाविकांना देखील या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सांडपाणी येत असल्यामुळे वाहनांमुळे हे सांडपाणी नागरिकांच्या अंगावर उडत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे.

बाणेर गावठाण परिसरातील ड्रेनेज लाईनची स्वच्छता करण्यात यावी तसेच रस्त्यावर येणारे सांडपाणी थांबवण्यासाठी उपाय योजना करण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

See also  महात्मा फुले जयंती निमित्त बाणेर मध्ये 102 जणांनी केले रक्तदान