शिक्षक दिनानिमित्त एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने वस्ती भागातील शिक्षकांचा सन्मान

पुणे : शिक्षक दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी प्रभाग 28 व गुलटेकडी एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने वस्ती भागातील शिक्षकांचा सन्मान हा मुकुंद नगर येथील महाराष्ट्र मंडळाचे प्रगणात शाळेतील शिक्षकांचा व अंगणवाडी शिक्षिका व सेविकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी शिक्षक परमेश्वर हुजगे,आशा पलंगे ,जन्नत शेख ,नसिम शेख,सोनाली खंडागळे, स्वाती शेरला भारतीय जनता पक्षाचे चिरंजीव वैष्णव ,गौतम बनसोडे ,हेमंत जगताप ,नितीन गायकवाड ,दीपक शेलकर ,राहुल नाटेकर व भारतीय जनता पक्ष व एकता प्रतिष्ठानचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

यावेळी महिला बचत गटांनी तयार केलेले इको फ्रेंडली बुके देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन गणेश शेरला यांनी केले.

See also  कुस्ती संघाच्या अध्यक्ष ला अटक करावी या महिला कुस्तीगिरांच्या मागणीला पाठिंबा देत आपची निदर्शने !