कृषी उत्पन्न बाजार समितीने फिश व पोल्ट्री मार्केटच्या ठरावा विरोधात सर्वपक्षीय आंदोलन

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने फिश व पोल्ट्री मार्केट करण्याकरता केलेल्या ठरावाच्या विरोधात सर्वपक्षीय व व्यापारी वर्ग यांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. बाजार समितीचे सचिव दौंडकर साहेब यांना सर्वपक्षीय निवेदन देण्यात आले.

तसेच भारतीय जनता पार्टी पर्वती मतदार संघ व प्रभाग क्र २८ च्या वतीने आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थित नगरसेवक श्रीनाथ भिमाले,राजेंद्र शिळीमकर ,रूपाली धावडे,कविता वैरागे,राजश्री शिळीमकर,प्रवीण चोरबेले, गणेश शेरला ,विश्वास ननावरे प्रशांत दिवेकर ,राजू कदम लहू जागडे किरण वैश्णव यांच्यावतीने वैयक्तिक निवेदन देण्यात आले.
बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

See also  जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना सर्वंकष माहिती द्यावी- नियोजन उपायुक्त संजय कोलगणे