श्री गणेशाच्या मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्यावर ८० वर्षात पहिल्यांदाच दुर्मिळ योग….”एकाच मुर्तीकाराने घडवलेली, नारायण पेठेतील तीन दिग्गज मंडळे लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीत प्रथमच एकाच चौकात एकत्र….

पुणे : (जितेंद्र गोळे)- आज श्री गणेश उत्सवाचा स्थापना दिवस, त्यानिमित्ताने श्री गणपती मिरवणूकीचे वातावरण संपूर्ण शहरात असताना या मिरवणुकीत पुण्यातील नारायण पेठेतील लक्ष्मी रस्त्यावर एक दुर्मिळ योग गणेश भक्तांनी ८० वर्षात पहिल्यांदाच अनुभवला…… तो म्हणजे बेळगांव येथील सुप्रसिध्द मुर्तीकार श्री नागेश शिल्पी पंडीत यांनी पुणे शहरात श्री गणरायाच्या एकूण नऊ घडवल्या, त्यातील आज नारायण पेठेतील श्री गजानन मंडळ, श्री गरूड गणपती आणि श्री माती गणपती या तीन दिग्गज मंडळांच्या श्री गणरायाची मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरून विविध ठिकाणांहून होत असताना हि तीनही मंडळांची मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरील विजय टॉकीज – शेंडगे विठोबा चौक येथे एकत्र आली…. आणि तीनही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी “श्री गणपती बप्पा” च्या नावाचा एकच जल्लोष केला…. आणि शेकडो महिला बाल गोपाळसह गणेश भक्तांनी ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीत एकीचे दर्शन घडविले.


यावेळी श्री गजानन मंडळ अध्यक्ष राकेश गाडे पाटील, उत्सव प्रमुख अमेय गाडे पाटील, श्री गरूड गणपती मंडळ अध्यक्ष सुनील कुंजीर, मयूर कडू आणि श्री माती गणपती मंडळ परेश हराळे यांनी यावेळी एकत्रितपणे तीनही गणपतीची महाआरती केली. गेल्या ८० वर्षात आज तीनही मंडळाच्या गणपतीचे प्रथमच एकाच चौकात एकत्र दर्शन घडल्याने गणेश भक्तांनी वेगळाच आनंद अनुभव….

See also  पुणे शहारातील वाहतुक सुविधा आणि पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य-अजित पवार