कचरा व डुक्करांच्या प्रश्नाबाबत नाना वाळके यांचे निवेदन

औंध : औंध परिसरातील विविध समस्या संदर्भात शिवसेनेचे नाना वाळके यांनी सहायक आयुक्त गिरीश दापकेकर यांची भेट घेऊन औध मधील विविध ठिकाणी होणाऱ्या कचऱ्या संबंधित चर्चा करून कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत निवेदन दिले.

तसेच औंध गाव, डी पी रोड, पल्लोड फार्म, विधाते वस्ती ओढ्याजवळी भागात फिरणाऱ्या डुक्करांच्या वावरा मुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असून यावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

याबाबत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न विचारात घेऊन तातडीने कारवाई करण्याचा आदेश यावेळी सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांनी दिले. या प्रश्नांबद्दल कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

See also  स्वच्छ ऊर्जा, सर्वांगीण आरोग्य व लोकाभिमुख विज्ञानावर भर
विज्ञान भारती, 'इनसा' व 'आयआयटीएम' यांच्यातर्फे 'सायन्स-२०' अंतर्गत आयोजित परिसंवादात वैज्ञानिकांचा सूर