स्त्री आधार केंद्रातर्फे जागतिक कौटुंबिक हिंसाचार विरोधी दिनानिमित्ताने “महिला आरक्षण विधेयकाचे स्वागत आणि त्या बाबत खुली चर्चा” या कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : स्त्री आधार केंद्रातर्फे जागतिक कौटुंबिक हिंसाचार विरोधी दिनानिमित्ताने “महिला आरक्षण विधेयकाचे स्वागत आणि त्या बाबत खुली चर्चा”या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

1993 मध्ये 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती झाली. ज्याने संविधानात पंचायत आणि नगरपालिकांची ओळख करून दिली, या संस्थांमध्ये महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवल्या. यावेळी लोकसभा आणि राज्यसभेत महिलांसाठी आरक्षणाची तरतूद संविधानात नव्हती.
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सध्या महिला सदस्यांची संख्या केवळ १४% आहे तर विविध राज्यात विधानसभांमध्ये सरासरी १०% आहे. महिलांचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढवण्याच्या हेतूने आता ‘संविधान एकशे अठ्ठावीसवी सुधारणा विधेयक, 2023’ हे 19 सप्टेंबर 2023 रोजी लोकसभेत सादर करण्यात आले. हे विधेयक लोकसभा आणि राज्य विधानसभेतील एकूण जागांपैकी एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याबाबत आहे. हे विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळात २० सप्टेंबर २०२३ रोजी बहुमताने मंजूर झाले आहे.


मागील अनेक वर्षे विधान परिषदेच्या उपसभापती व स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने विविध कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला आहे, तसेच महाराष्ट्रात महिलांच्या अनेक प्रश्नांवर काम केले आहे. मागील अनेक वर्षे संस्थेने पंचायतराज वर विविध कार्यक्रम, कार्यशाळा, उपक्रम देखील राबवले आहेत. तरी उपरोक्त विषयाला अनुसरून स्त्री आधार केंद्रातर्फे जागतिक कौटुंबिक हिंसाचार विरोधी दिनानिमित्ताने “महिला आरक्षण विधेयकाचे स्वागत आणि त्याबाबत खुली चर्चा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


यावेळी, विधान परिषद उपसभापती तथा अध्यक्ष स्त्री आधार केंद्राच्या मा. डॉ. नीलमताई गोऱ्हे, माजी महापौर तथा माजी विधान परिषद आमदार मा. दीप्ती चवधरी, माजी नगरसेविका मा. माधुरी सहस्त्रबुद्धे, माजी नगरसेविका मा. रूपाली ठोंबरे पाटील, महिला अध्यक्ष महाराष्ट्र RPI गट मा. चंद्रकांता सोनकांबळे, महिला संचालिका प्रसिद्धी विभाग महाराष्ट्र राज्य तथा जेष्ठ पत्रकार मा. श्रद्धा बेलसरे, तसेच स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त मा. जेहलम जोशी हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
दिनांक – २७/०९/२०२३ बुधवार
स्थळ – विद्यार्थी साहाय्यक समिती हाँल, फर्ग्युसन कॉलेज रोड, ललित महल हाँटेल समोर, ज्ञानेश्वर पादुका चौकीजवळ, पुणे ५
वेळ :- दुपारी २.३० वाजता
कार्यक्रम निमंत्रितांसाठी आहे.

See also  बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामकरण