आमदार नितेश राणे यांच्या विरोधात तृतीयपंथीयांचे आंदोलन; पोलिसांची कारवाई

पुणे : माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वर टीका करताना काल भाजपचे नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा आक्षेपार्ह फोटो ट्विट केल्याने तृतीय पंथीयांनी नितेश राणे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत नितेश राणे यांच्याविरोधात तृतीय पंथीय संघर्ष समितीने आंदोलन करण्यात आले.

कलंक केलेल्या टिकेनंतर नितेश राणे यांनी ट्विटवर उद्धव ठाकरे यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर टिका केली. मर्दानगीवर कलंक, हिजड्यांच्या प्रमुखांकडून अजून काय अपेक्षा, बायला कुठला असं म्हणत नितेश राणे यांनी ठाकरेंवर टिका केली. याविरोधात तृतीय पंथीय समाजाचा अपमान केल्यामुळे नितेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत बंड गार्डनसमोर तृतीय पंथीयांनी आंदोलन केले.

भाजपचे नेते नितेश राणे यांनी ट्रान्सजेंटर अक्टनुसार त्यांनी तृतीय पंथीयाचा अपमान केला आहे. त्यांच्यावर १५३ अतंर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आम्ही बंडगार्डन पोलीस स्टेशनकडे केली आहे. जर पोलीस स्टेशनकडून यावर कारवाई केली नाही तर आम्ही कोर्टाचे दरवाजे ठोठावू, अशी भूमिका तृतीय पंथीय समाजाने घेतली आहे.

दरम्यान पोलिसांनी चौकामध्ये आंदोलन करत असलेल्या तृतीयपंथीयांना कारवाई करून बाजूला केले.

See also  खासदार संजय राऊत यांची निकालानंतरची प्रतिक्रिया